Our Journey

सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट…

मला माहित नाही ही पूर्व जन्मीची पुण्याई समजायची की मी खरोखरीच एवढी भाग्यवान आहे. आपण पाहतोय ते स्वप्न की भास तेही निश्चित सांगता येणार नाही. परंतु साक्षात विठू माऊलीने मला दर्शन दिले. ते सावळ, मोहक रूप डोळ्यात साठवून ठेवावं म्हणून विठुरायाला घरी आणायचे ही मी त्याच क्षणी ठरवले. एखादी प्रतिमा, चित्र घरात लावावे की मूर्ती आणावी हा विचार घोळत असतानाच बाप्पांच्या आगमनाचे दिवस आले.

गणपतीबप्पा साठी काही वस्तू आणायला गेले आणि समोर विठ्ठल रखुमायीची मूर्ती पाहून माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. डोळ्यात अश्रू उभे राहिले. बाप्पा बरोबर विठू माऊली घरी आले.देव्हारा सजवणे, आरास करणे, रांगोळी घालणे, विविध दिवे लावणे हा तर माझा नित्याचा उपक्रम होऊन बसला.माउलींच्या कृपेने अगदी कोविड काळातही माझे साड्यांचे दुकान तग धरून होते. अचानक एक दिवस एकानी मला विठ्ठलाची मूर्ती सजवून द्याला का अशी विचारणा केली. आणि मग माझ्या आणि माझ्या दुकानातील माझ्या सहकार्यांना उत्सहाचे उधाण आले. पाहता पाहता शंभर मूर्तीसाठी शेले, पितांबर, मुकुट बनवायला सुरुवात केली. त्याबरोबरच दुकानात आंब्याचे कापडी तोरण, केळीचे खांब, सुबक पद्धतीने सजवलेले ओटीचे सामान अशा अनेक वस्तू दुकानात ठेवायला सुरुवात केली. साड्यांबरोबर त्याही वस्तूची मागणी वाढू लागली. खरंच सांगते माउलींच्या आशीर्वादाने पुन्हा मागे वळून पाहावे लागलेच नाही. माझे कष्ट आणि कल्पकता होतीच पण त्या श्रीहरीच्या वरदहस्तशिवाय हे शक्यच नव्हते.

आज मुक्ताबाईंच्या भक्ती आणि जनाबाईंच्या भानडेपणाला स्मरून मी हे श्रद्धासुमन, माझ्या कल्पनेतून साकारलेली ही दिंडीची साडी त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते.

दिपा लेले चेऊलकर ,
साजिरी सण समारंभ

  • Natural fabrics
  • 100% Bio

Back to Top

Search

Product has been added to your cart